in

लोकल प्रवास सुलभ ; लसीकरण झालेल्या प्रवाशांना आता दैनंदिन तिकीट.

दोनही लसीकरण होउन १४ दिरस झालेल्या प्रवाशांना उपनगरीय रेल्व प्रवासासाठी दैनंदिन तिकिटे देण्यास राज्य सरकारने रविवारी मंजुरी दिली. त्यामुळे रेल्वेनेही रविवारपासूनच दैनंदिन तिकीटाविक्रीस सुरवात केली या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.अशीच घट होत राहिल्यास दिवाळीनंतर अन्य निर्बंधही शिथिल करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
दोनही लसमात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र रेल्वे स्थानकातील पालिका कर्मचायांकङ्न प्रमाणित केल्यानंतर ते तिकीट खिङक्यांवर दाखवावे लागेल.ते दाखवल्यावर प्रवाशांना तिकीट मिळेल किंवा ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ दाखवूनही तिकीट घेता येईल,असे रेल्वेने स्पष्ट केले. दैनंदिन तिकिटे दिली जात नसल्याने विनातिकीट प्रवाशांची संख्याही वाढली होती.करोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानेच राज्य सरकारने जास्तीत जास्त निर्बंध शिथिल करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी दैनंदिन तिकिटे वितरित करण्यास परवानगी दिली . त्यानंतर लगेचच रेल्वेने खिडक्यांवर तिकीटविक्री सुरू केली. राज्य सरकारच्या निर्णयाने लाखो मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. त्यातही दिवाळीपूर्वी हा निर्णय झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सरकारने ऑगस्टपासून रेल्वे प्रवासाला परवानगी दिली असली तरी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना मासिक पास काढूनच प्रवास करावा लागत होता. यामुळे मुंबईकरांमध्ये अस्वस्थता होती. एखादा दिवस प्रवास करायचा झाल्यास तिकीट दिले जात नव्हते परिणामी मासिक पास काढावा लागे किंवा रस्तेमार्गे प्रवासाची कसरत करावी लागे. राज्य सरकारने मान्यता दिल्यावरच दैनंदिन तिकिटे दिली जातील, असे रेल्वेने स्पष्ट केले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एक आई म्हणून वाईट वाटतं’ : सुप्रिया सुळे

भाजपासोबत गेलेले राष्ट्रवादीचे चौदा नगरसेवक सहा वर्षासाठी निलंबित