in

पुण्यामध्ये १ मे पासून खासगी रुग्णालयांना लस पुरवठा बंद

पुणे शहरातल्या लसीकरणाचा गोंधळ अजुनही कायम आहे. कमी येत असलेल्या लसींमुळे आता १ तारखेपासुन सरसकट लसीकरण कसं करणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आता मात्र पुणे महापालिकेने १ तारखेनंतर देखील ज्येष्ठ नागरिकांचेच प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या डोस घेणाऱ्या नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे शहरांमध्ये लसीकरण मोहिमेने सुरुवातीला वेग घेतला होता. मात्र नंतर येणाऱ्या लसीची संख्या कमी झाल्याने अगदी थोड्या लोकांना लस मिळायला सुरुवात झाली होती. अपॉईंटमेंट घेऊनही अनेक नागरिकांना स्टॉक नसल्याने परत फिरावं लागत होतं. थेट वॉक इन लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…आता घरातही मास्क लावण्याची वेळ आलीय; केंद्र सरकारचा इशारा

KKR vs PBKS : कोलकत्ताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय