in

‘१० कोटी द्या अन्यथा शासकीय कार्यलयं बॉम्बने उडवून टाकू’

दहा कोटी रुपये द्या, नाहीतर नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व अन्य शासकिय कार्यालय बॉम्बने उडवून टाकू, अशा धमकीचा मेल पाठवणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता.23) अटक केली.

अधिक माहितीनुसार, आरोपी विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 125 जागी हॉटस्पॉट फुटायला तयार आहेत, अशी धमकी होती. सोबतच त्याने सर्व कार्यालयांची लिस्ट जोडली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर 8 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एक मेल आला.

यामध्ये 10 कोटी रुपये द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, इतर महत्वाची कार्यालये आणि संपुर्ण नांदेड शहर बॉम्बने उडवून टाकेन असा संदेश सदर ई-मेलमध्ये लिहिलेला होता. या प्रकरणी विविध आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत संपर्क साधून या मेल पाठविणाऱ्याची माहिती मिळवली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्र चार टप्प्याने अनलॉक होणार?; जाणून घ्या!

Weather Updates | मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता