in

मुंबईकरांसाठी १० नव्या मोनोरेल येणार!

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने Mono Rail साठी कंबर कसली असून, आगामी वर्षभरात नवीन मोनोगाड्या मुंबईत दाखल होणार आहेत. यासाठी भारतीय कंपनीला काम देण्यात आले असून, मेक इन इंडिया धर्तीवर बांधण्यात येणारी भारतीय बनावटीची पहिली मोनो वर्षभरात मुंबईत दाखल होणार आहे.

मुंबईतील संत गाडगे महाराज चौक-वडाळा-चेंबूर दरम्यान २० किमी मार्गावर मोनोरेल धावत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असा हा प्रकल्प मानला जातो. मोनोरेल टिकवण्यासाठी भविष्यात या मार्गाला मेट्रो मार्ग जोडण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. आताच्या घडीला मोनोरेलसाठी प्रवाशांना साधारणपणे २५ ते ३० मिनिटे वाट पाहावी लागते. गाड्या उपलब्ध नसल्याने फेऱ्या वाढवण्यास प्रचंड मर्यादा आहेत, असे सांगितले जात आहे.

मेधा कंपनीला ५९० कोटींचे कंत्राट

स्वदेशी बनावटीच्या १० गाड्या दाखल झाल्यानंतर एकूण १७ गाड्यांच्या माध्यमातून प्रति ४ ते ६ मिनिटाला एक फेरी उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे. तसेच मेधा कंपनीला १० मोनोरेल गाड्या बांधण्यासाठी ५८९ कोटी ९५ लाखांचे कंत्राट देण्यात आले असून, मुंबई मोनोरेल प्रकल्पासाठी डिझाइन आणि तांत्रिक बाबींकरिता सल्लागार नियुक्तीसाठी खुल्या स्वरूपात निविदादेखील मागवल्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

93 हजार एसटी कामगारांना सप्टेंबरचा पगार मिळणार; अनिल परब यांची माहिती

“टू-व्हीलर चालवण्यापेक्षा नगरपालिका व्यवस्थित चालवा”