in

राज्यातील 105 नगर पंचायत निवडणूक घोषणा, नगरपंचायत परिसरात आजपासून आचारसंहिता लागू

भूपेश बारंगे | वर्धा : राज्यातील विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे.  मतमोजणी  22 डिसेंबरला होणार असून आजपासून नगर पंचायत अंतर्गत आचारसंहिता लावण्यात आली.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या मतदार याद्या मतदानाला ग्राह्य धरणार आहे.30 नोव्हेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. राज्यातील 105 नगर पंचायत निवडणूक मतदान 21 डिसेंबर होणार असल्याने राजकीय पक्ष आता कामाला लागले आहे. वर्धा जिल्ह्यात कारंजा(घाडगे),आष्टी, सेलू, समुद्रपूर या चार नगर पंचायत यात समावेश आहे. जिल्ह्यातील चार नगर पंचायत मधील भावी उमेदवार मतदाराला भेटीगाठी घेत आहे.निवडणूक आयोगाने लवकरच निवडणूक घोषणा केल्याचे पत्र काढल्याने अनेक राजकिय नेत्यांची धावपळीच्या सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील चार नगर पंचायत कोण बाजी मारणार
नव्याने झालेल्या नगर पंचायत वेळेस कारंजा (घाडगे), आष्टी या नगर पंचायत मध्ये काँग्रेस पक्षाचे सत्ता मिळवली होती तर सेलू मध्ये काँग्रेस व भाजपचे युती होऊन अडीच वर्षे सत्ता मिळवली त्यानंतर काँग्रेस व दफ्टरी गट युती करून सत्ता काबीज केली तर समुद्रपूर नगर पंचायत भाजपची सत्ता मिळवली होती आता या नगर पंचायत वर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

St Worker Strike | वेतनवाढीच्या प्रस्तावानंतरही तिढा, संप मागे घेण्याबाबत कर्मचारी संघटनेचा आज निर्णय

समीर वानखेडेंच्या आईच्या मृत्यूचे दोन दाखले, नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट