in

हसन मुश्रीफ कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केला आहे.हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप असून, या संबंधित तब्बल २७०० पानी पुरावे आयकर विभागाकडे सादर केले आहेत. या आरोपानंतर महाविकास आघाडीच्या चिंतेत भर पडली आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांवर शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप केला आहे. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

“CRM Systems PVT LTD इथे प्रविण अगरवाल ऑपरेट करतात. या कंपनीतून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं लोन घेतल्याचं दाखवलंयय. या कंपनीवर २०१७-१८मध्ये प्रतिबंध आला होता. त्या कंपनीतून ज्यांनी एंट्री घेतली, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. त्याच कंपनीतून नाविद मुश्रीफ यांनीही निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलंय की सीआरएम कंपनीत २ कोटी ४५ लाख ३५४ एवढी रक्कम दाखवली आहे. सीआरएम ही शेल कंपनी असल्याचं सिद्ध झालं आहे”, असा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोयनासह चांदोली धरणातून कृष्णा, वारणेत विसर्ग; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ…

रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोण झाले अलिबागकर