in

दिल्लीत ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यानं २५ रुग्णांचा मृत्यू

Hyderabad: A medic looks on at a patient who has shown positive symptoms for coronavirus (COVID -19) at an isolation ward in Hyderabad, Tuesday, March 10, 2020. (PTI Photo) (PTI10-03-2020_000060B)

दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या २५ गंभीर रुग्णांचा गेल्या २४ तासात मृत्यू झाला आहे, अशी माहिती रुग्णालयाकडूनच देण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असून ऑक्सिजनवर असणाऱ्या ६० हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात आहे. ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

अनेक राज्यांप्रमाणे दिल्लीतही अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे. गंगाराम रुग्णालय हे दिल्लीमधील खासगी रुग्णालयांमध्ये असून ६७५ बेड्सचं एक नामांकित रुग्णालय आहे. मात्र, तिथेही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून २५ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

गेल्या २४ तासांत २५ गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फक्त दोन तास पुरेल इतकाच साठा सध्या शिल्लक आहे. व्हेटिंलेटरदेखील नीट काम करत नाही. आयसीयू आणि आपत्कालीनमध्ये सध्या मॅन्यूअल व्हेटिंलेशन सुरू आहे. मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. ६० रुग्णांचा जीव सध्या धोक्यात असून तत्काळ मदतीची गरज आहे. रुग्णालयाने तत्काळ ऑक्सिजन एअरलिफ्ट करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विरार दुर्घटना | पंतप्रधान आणी मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना लाखांची मदत

विरार रुग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी