in ,

२९ वर्षीय भारतीय क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

भारताचा युवा क्रिकेटपटू अवी बरोट याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो 29 वर्षांचा होता. अवी बरोट सौराष्ट्रासाठी क्रिकेट खेळत होता. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. भारताचा 19 वर्षांखालील कर्णधार अवी बरोट हा सौराष्ट्रच्या विजेत्या संघाचा एक भाग होता, ज्याने 2019-20 मध्ये रणजी करंडक विजेतेपद पटकावले होते.

याशिवाय, या वर्षी जानेवारीत खेळलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतही त्याने सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. अवि बरोटच्या निधनाने क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. बीसीसीआय़चे सचिव जय शहा यांच्यासह इतर दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. अवि बरोट यष्टीरक्षक फलंदाज होता. कधीकधी तो गोलंदाजीही करायचा. त्याने आपल्या कारकिर्दीत ३८ प्रथम श्रेणी सामने, ३८ लिस्ट ए सामने आणि २० स्थानिक टी-२० सामने खेळले होते.

बरोटने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एक शतक आणि नऊ अर्धशतकांच्या मदतीने १५४७ धावा केल्या होत्या. लिस्ट ए सामन्यांमध्ये ८ अर्धशतकांच्या मदतीने १०३० धावा केल्या गेल्या. बरोट टी-२० क्रिकेटचा स्फोटक खेळाडू होता. त्याने देशांतर्गत टी-२० मध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने ७१७ धावा केल्या. टी-२० मध्ये त्याचा स्ट्राइक रेट १४६ आणि सरासरी ३८च्या आसपास होती. २०१०-११ कूचबिहार करंडकात गुजरातसाठी चार शतके आणि तीन अर्धशतके ठोकल्याबद्दल बरोटला बीसीसीआयने अंडर-१९ क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कारही दिला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘शहजादा’ मध्ये दिसणार कार्तिक आर्यन आणि कृति सेनन

भूमी पेडणेकर होणार ‘पत्रकार’