in

मुंब्रा येथील प्राईम रुग्णालयाला मध्यरात्री आग; ४ जणांचा मृत्यू

मुंब्रा येथील प्राईम रुग्णालयाला (prime hospital) मध्यरात्री 3 वाजता भीषण आग लागली होती. या आगीचे कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. तसेच या आगीत ३ जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, मदतकार्य चालू असून आग आटोक्यात आली आहे, अशी माहिती मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली आहे. रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. रुग्णालयात १७ रुग्ण दाखल होते त्यातील ३ जणांचा या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

रुग्णालयाला आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सदर आगीच्या घटनेत मृ्त्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींना देखील १ लाख देण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; ‘या’ विषयांवर चर्चा होण्याची शक्यता

मुंबईकरांना दिलासा : कोरोना रुग्णांमध्ये झाली घट