in

महाआवास अभियानाअंतर्गत 3 लाख 23 हजार लाभार्थ्यांनी केला गृहप्रवेश

महाआवास अभियानाअंतर्गत आज 3 लाख 23 हजार लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला असून त्यांनी गृहप्रवेश केला. तर या अभियानाअंतर्गत सुमारे 4 लाख 68 हजार घरकुलांची बांधकामे पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या अभियानातून सुमारे आठ लाख कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे.

सह्याद्री अतिथृगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या, तर याचवेळी ई-गृहप्रवेशांतर्गत राज्यभरातील एकूण ३ लाख २२ हजार ९२९ लाभार्थ्यांना त्या त्या जिल्ह्यात चाव्यांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राहूल शेवाळे, खासदार विनायक राऊत उपस्थित होते.

महाआवास अभियान कालावधीत 8 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट विभागाने निश्चित केले होते. त्यातील ३ लाख २२ हजारांहून अधिक घरकुले बांधून पूर्ण झाली ज्याच्या चाव्या आज आपण लाभार्थ्यांना देत आहोत, तर उर्वरित 4 लाख 67 हजार 953 घरांचे काम एक महिन्यात पूर्ण होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास विभागाने जलदगतीने घरे बांधून गोरगरीबांना त्यांचे हक्काचे घर मिळवून दिल्याबद्दल ग्रामविकास विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

40 लाख नागरिकांना मिळाले हक्काचे छत

महाआवास अभियानामध्ये आज गृहप्रवेश केलेली ३ लाख २३ हजार कुटुंबे आणि बांधकाम पुर्णत्वाच्या मार्गावर असलेली ४ लाख ६८ हजार कुटुंबे अशा एकुण ८ लाख कुटुंबांची सरासरी सदस्य संख्या लक्षात घेतली तर सुमारे 40 लाख लोकांना घरकुलाचे छत मिळाले आहे. कोरोनाचे संकट असतानाही सर्व यंत्रणेने एकजुटीने हे अभियान यशस्वी केले. आता चालू वर्षात प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांनाही घरे देण्यात येतील. राज्यात ग्रामीण भागात स्वत:चे घर नाही असे एकही कुटुंब बाकी राहू देणार नसल्याचा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Lokshahi Impact: लोकशाहीच्या बातमीनंतर महापालिका प्रशासनाला आली जाग

Maharashtra Corona | राज्यात नवीन बाधितांसह मृतांच्या आकड्यात वाढ