in

Maharashtra Corona | राज्यात ३ हजार ६८५ जण कोरोनामुक्त

राज्यात आज दिवसभरात तर ३ हजार ५३० नवीन कोरोनाबाधित आढळले असून ३ हजार ६८५ रूग्ण बरे झाले आहेत. याशिवाय, ५२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६८५ रूग्ण बरे झाले आहेत, आजपर्यंत एकूण ६३,१२,७०६ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०६ टक्के एवढे झाले आहे. तर ३ हजार ५३० नवीन कोरोनाबाधित आढळले. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६५,०४,१४७ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ४९,६७१ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. ५२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.राज्यात आजपर्यंत १३८२२१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; महाराष्ट्राच्या सांगितिक परंपरेच्या आठवणी झाल्या जाग्या

पत्रकार, राजकीय पुढारी अतिरेकी आहेत काय? सामनातून केंद्र सरकारला खोचक सवाल