in

खळबळजनक : ४८ मुलींसह ९ शिक्षकांना कोरोनाची लागण

पुण्यातील शिरूर निवासी मुलींच्या शाळेतील ४८ मुली व 9 शिक्षक अशा एकूण ५७ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोग्य विभागासह सर्व अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली. शाळेमध्ये एक कोरोना रुग्ण असल्याची माहिती नगर परिषदेला समजली. त्यानंतर तो रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सर्व मुलींची अँटीजन टेस्ट करण्यात आली.

दरम्यान, या चाचणीत 48 मुली व 9 शिक्षक कोरोनाबाधित आढळले. शाळेतील एक शिक्षक बाहेरगावाहून येत असल्याने प्रार्दुभाव झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डीला नागपुरातून अटक

#IPL2021 | मुंबई इंडियन्स आज राजस्थान रॉयल्सशी सामना