in

दिलासादाय ; अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दिव्यांग शाळेतील 4899 शिक्षक व 6159 अन्य कर्मचारी अशा एकूण 11 हजार 58 कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.

मागील महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासनमान्य अनुदान प्राप्त दिव्यांग निवासी, अनिवासी, विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे चालविण्यात येतात. या सर्व शाळांमधील 11 हजार 58 शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL 2021: अक्षर पटेलची कोरोनावर मात

नागार्जुनचा ‘वाइल्ड डॉग’ आता ओटीटीवर प्लेटफॉर्मवर