in

Maharashtra Corona | राज्यात ९६३ नवीन कोरोनाबाधित

राज्यात कोरोनाचा संसर्ग खालावताना दिसत आहे. दररोज येणार्या आकडेवारीत रुग्णसंख्या घटत आहे, तर मृतांची संख्याही खालावत आहे. त्यामुले ही दिलासादायक बाब आहे.

राज्यात आज दिवसभरात ९६३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,२७,८३८ झाली आहे. राज्यात ९७२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण ६४,७१,७६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६५ टक्के एवढे झाले आहे. याशिवाय, २४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत १४०६९२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.राज्यात आज रोजी एकूण ११,७३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तीन पक्ष बदलणाऱ्यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये; लीना गरड यांची आ. प्रशांत ठाकूरांवर जहरी टीका

रेल्वे मालधक्का येथे विजेचा शॉक लागून हमालाचा मृत्यू