in

पावसाचे आगमन लांबणीवर; केरळमध्ये पावसाचा नवा मुहूर्त

केरळमध्ये मोसमी वारे दाखल होण्याचा नवा मुहूर्त ३ जून असा हवामान विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे पाऊस तेथे पोहोचल्यानंतरच त्यांची महाराष्ट्राकडे वाटचाल होण्याचा अंदाज आहे.

सुरुवातीच्या काळात वेगाने मोसमी वारे मार्गक्रमण करीत असल्याने १ जूनचे केरळमधील नियोजित आगमन एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी होईल, असा हवामान विभागाचा अंदाज होता. त्याचवेळी चार दिवस पुढे-मागे होण्याची शक्यताही गृहीत धरली होती.

सध्या मोसमी वाऱ्यांची प्रगती थांबली असली तरी १ जूनला पोषक स्थिती निर्माण होऊन त्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार केरळमध्ये त्यांचे आगमन ३ जूनला होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”कोरोनाची साथ सरकारी कार्यक्रम नव्हे”; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

”मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच पडलीच पाहिजे”