in

आसाराम बापूला कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

राजस्थानमधील जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूला बुधवारी रात्री प्रकृती बिघडल्यामुळे महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी आसाराम बापूला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर जेल प्रशासनाने पुढील उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे. कोरोना संसर्गामुळे आसाराम बापूची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले आहे.

आसाराम बापूला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची सौम्य लक्षण दिसत होती. सोमवारी 3 मे रोजी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी 5 मे रोजी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची प्राथमिक तपासणी करून त्याला आयसीयूमध्ये दाखल केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रालोदचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन

अनिल देशमुखांच्या याचिकेवर आज सुनावणी