in

परमबीर सिंग यांना दिलासा… १५ जूनपर्यंत कारवाई पुढे ढकलली

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीदरम्यान अंतरिम दिलासा दिला होता. ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात ९ जूनपर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात १५ जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही किंवा कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

मात्र, तोपर्यंत परमबीर यांची ठाणे पोलीस करत असलेला गुन्हा रद्दबातल करण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी सोमवारी घेण्यात येईल. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १४ जूनपर्यंत तहकूब केली.

अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार केल्याने सरकार सूडबुद्धीने आपल्यावर गुन्हे दाखल करत आहे. खोट्या प्रकरणांत आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सिंग यांनी याचिकेद्वारे केला आहे. आपल्यावरील गुन्हा रद्द करावा आणि याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत आपल्यावर कठोर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी सिंग यांनी याचिकेद्वारे केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी सिंग यांना १५ जूनपर्यंत अटक न करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Dingko Singh Passed Away; आशियाई सुवर्णपदक विजेता बॉक्सर डिंको सिंह यांचे निधन

कारचा भीषण अपघात! दोघे ठार , तर चिमुकलीचा उपचार दरम्यान मृत्यू