in

अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेते आणि अभिनेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमारने स्वत: ही माहिती सोशल मीडियावरुन ट्विट करत ही माहिती दिली आहे.

ट्विट करत अक्षयने सांगितले आहे की, “आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या. तसेच शक्य असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. Back in Action Very Soon,”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राजू शेट्टी पंढरीत

‘फडणवीसजी, मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली ते सांगा’