in

अभिनेता कबीर बेदी यांनी ‘या’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिवसातून 8 तास प्रवास करण्याचे ठरवले!

अभिनेता आणि देखणा हंक, कबीर बेदी वयाच्या ७५ व्या वर्षीही चमकत आहेत. वेब सिरीज असो की चित्रपट, कबीर बेदींची उपस्थिती स्वतःमध्ये खास आहे.
बॉलीवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये स्वत:ला सिद्ध करणाऱ्या कबीर बेदी यांना कोणत्याही भूमिकेसाठी तयार करणे सोपे काम नाही. मात्र अलीकडे, एका फोनवर चित्रपटाचे वर्णन ऐकल्यानंतर, श्री. बेदी यांनी लगेच होकार दिला, जरी त्यांना त्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तासनतास प्रवास करावा लागला तरी.
‘द जंगीपूर ट्रायल’ चित्रपटाचे दिग्दर्शक देबादित्य बंदोपाध्याय आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर अमित बहल यांनी कबीर बेदींना फोनवर कथा सांगितली तेव्हा त्यांना चित्रपटाचा कथानक खूप आवडले आणि त्यांनी लगेच होकार दिला.
आणि शूटिंगसाठी पहिली फ्लाइट घेऊन ते जॉय सिटी म्हणजेच कोलकाता येथे पोहोचले.

पहिल्या दिवसाप्रमाणेच ते रोज सेटवर यायचे. सेटवरील बाकीच्या स्टारकास्टने त्याचं स्वागत केलं. कबीर बेदी म्हणतात की, “मला चित्रपटाची कथा, कथानक आणि स्टारकास्ट खूप आवडली. यात अनेक चांगले कलाकार आहेत जे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेतील.” वयाच्या 75 व्या वर्षी 150 चित्रपट करून भारतीय, अमेरिकन आणि इटालियन चित्रपटांमध्ये झंझावाती खेळी साकारणारा अभिनेता कबीर बेदींच्या ‘द जंगीपूर ट्रायल’या चित्रपटात आता दिसणार आहेत.

शूटिंग लोकेशनबद्दल बोलायचे झाले तर ‘द जंगीपूर ट्रायल’चे शूटिंग अशा ठिकाणी झाले आहे जिथे आजपर्यंत एकाही हिंदी चित्रपटाचे शूटिंग झाले नाही. पश्चिम बंगालपासून 8 तासांच्या अंतरावर असलेल्या या सुंदर ठिकाणी निसर्गाने आपले हात पसरले आहेत. तेथील सुंदर दृश्ये दिग्दर्शकाने या चित्रपटात टिपली आहेत. या चित्रपटाची कथा इतकी दमदार होती की, दररोज शहर ते गाव असा सलग 8 तासांचा प्रवास केल्यानंतरही हे सर्व स्टार्स उत्साहात होते.

‘द जंगीपूर ट्रायल’ हा मल्टिस्टारर चित्रपट असून प्रत्येक पात्र स्वतःमध्ये खूप महत्वाचे आहे. कथेशी प्रत्येकाची तार जोडलेली आहे. कबीर बेदी व्यतिरिक्त या चित्रपटात झाकीर हुसेन, जावेद जाफरी, व्रजेश हिरजी, कन्नन अरुणाचल, अमित बहल, इश्तेयाक खान, सुशील पांडे, रवी झंकल, जय उपाध्याय, दीपक काझीर, समिक्षा भटनागर, चिराग वोरा, राजेश खट्टर आणि सताब हे कलाकार आहेत. एका सत्य घटनेवर आधारित, हा चित्रपट गोल्डन एरामधील सिंगल थिएटर्सची गजबज आणि त्यातून निर्माण झालेल्या हत्येचे रहस्य दाखवेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सहा आठवड्यात CNG-PNG तिसऱ्यांदा महागलं

मराठवाड्यात मेट्रो सुरू करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू – नितीन गडकरी