in ,

अभिनेत्री कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिला कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान याआधी अभिनेता विकी कौशलला कोरोनाचा संसर्ग झाला होता.

कतरिनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले आहे. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करुन घ्या’ असे तिने म्हटले आहे.

दरम्यान, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि गोविंदा यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सोबतच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया, रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख आणि गायक आदित्य नारायण या कलाकारांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Lockdown : राज्यभरात व्यापाऱ्यांचा दुकानं बंद ठेवण्यास विरोध, संघटना एकवटल्या!

भन्नाट डान्स : “एक नारळ दिलाय…”! आगरी गाण्यावर मुंबई इंडियन्स खेळाडूंचा डान्स