in

किरण खेर यांचा कॅन्सरशी लढा; 3 तास चालली बोन सर्जरी

ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार किरण खेर यांना काही दिवसांनपूर्वी कॅन्सरचे निदान झाले आहे. त्यांनतर आता त्यांना मुंबईच्या कोकिळाबेन रूग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर बोन सर्जरी करण्यात आली.

सकाळी 7.30 वाजता सुरू झालेली ही शस्त्रक्रिया 3 तास चालली. या शस्त्रक्रियेदरम्यान किरण यांच्या बोनमॅरोतून कॅन्सरच्या पेशी काढण्याचा प्रयत्न केला गेला. सर्जरीदरम्यान किरण खेर यांचे पती व अभिनेते अनुपम खेर पूर्णवेळ रूग्णालयात होते.

काही दिवसांपूर्वीच अनुपम खेर यांनी किरण यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. कधी कधी किरण खूप पॉझिटीव्ह असते. पण किमोथेरपीनंतर तिच्यात अनेकदा नैराश्य दाटून येते. आम्ही आमच्यापरीने पूर्ण काळजी घेत आहोत. ती सुद्धा आजाराला खंबीरपणे सामोरी जातेय. डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करत आहेत, असे अनुपम म्हणाले होते.डाव्या हाताला दुखापत झाल्यानंतर किरण यांच्या चंदीगडच्या पोस्ट ग्रॅच्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स येथे काही वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या होत्या. यावेळी त्यांना मल्टिपल मायलोमा म्हणजे एकप्रकारचा ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Coronavirus | ”देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर नोटा छापणे गरजेचे”

कोरोना संकटात पठाण बंधूनी केली ऑक्सिजन संचाची मदत