in

आर्यन खानला जामीन मिळाल्या नंतर; बॉलिवूड अभिनेता आर माधवनने केलं ट्वीट

मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला २४ दिवसानंतर जामीन मिळाला. या सुनावणीकडे सर्वांचा लक्ष लागलं होतं. दरम्यान सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर निर्णय दिला. त्यामुळे आता आर्यन खानची दिवाळी तुरुंगात नाही जाणार. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आर्यनला जामीन मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता आर माधवनने याने आर्यनला जामीन मिळाल्यानंतर ट्वीट केल.

बॉलिवूड अभिनेता आर माधवनने सांगितल “देवाचे आभार. एक बाप म्हणून मी खूप समाधानी आहे. सर्व चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी घडू दे”, अस ट्वीट केले आहे. पण, न्यायालयाने आर्यनला आज जामीन दिला असला तरी आजच तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याचं निकालपत्र आणि जामिनाच्या अटी यावर शुक्रवारी २९ ऑक्टोबर अंतिम निर्णय होईल. यानंतरच आर्यन तुरुंगाबाहेर येऊ शकेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जळगावमध्ये पोलिसांकडून व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात अॅडमिट