in

Lokशाहीच्या बातमीनंतर ‘त्या’ आत्महत्या प्रकरणातील 4 जणांवर गुन्हा दाखल

भूपेश बारंगे | वर्ध्यातील कारंजा नगर पंचायत कार्यालयात शनिवार 11 ला सकाळी लिपिक अशोक महादेव जसुतकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. नगर पंचायत कार्यलयात कार्यरत असलेल्या लिपिकाने कार्यलयातच पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. आत्महत्यापूर्वी अशोक जसुतकर यांनी खिश्यात चिठ्ठी लिहून ठेवली होती, या चिठ्ठी मध्ये नगर पंचायत च्या 4 कर्मचाऱ्यांचे नावांचा समावेश असल्याने आज पत्नी सुनंदा जसुतकर यांच्या तक्रारीवरून कारंजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझे पती अशोक जसुतकर कार्यालयातील एक वर्षांपासून कर वसुली विभागात काम करायचे कोरोनाच्या काळात माझ्या पतीची ड्युटी तहसील कार्यालयात भरारी पथकात लागली होती. त्या काळात माझे पती नगर पंचायत मधील कर वसुलीला नव्हते ,तरी सुद्धा त्या काळातील नगर पंचायतीचे कर वसुलीचे व पावत्याचे पैसे माझ्या पतीला वरिष्ठकडून तगादा लावून भरावयास सांगत होते. त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्यास प्रवृत्त करून त्यांनी काल नगर पंचायत कार्यलयात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नगर पंचायतीचे राजेंद्र घाडगे, देविदास पुंडलिक मानकर, तुषार साबळे, रामचंद्र नरवळे यांच्या नावाचा समावेश असून त्यांच्या विरुद्ध कारंजा पोलिसांत पत्नीच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही जणांना अजूनपर्यंत अटक करण्यात आली नसून या घटनेची तपास पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत , सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन मोहंदूळे , उपनिरीक्षक योगेंद्र यादव, गुड्डू थूल, निखिल फुटाणे ,मंगेश गंधे, अंकुश रामटेके करीत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Amrut Nagar Ghatkopar West

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरवंदना देणारा कार्यक्रम