in

रेमडेसिवीरसाठी ग्लोबल टेंडर… राज्य सरकार ‘अॅक्शन मोड’ मध्ये

राज्यभरात आणि देशात रेमडेसिवीर, ऑक्सिजन तसेच लसींचा तुटवडा जाणवत असताना राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील गरीब जनतेला मोफत लस देण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करत असून लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. त्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली असून येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान येत्या काळात रेमडेसिविर आणि लसींची वाढती मागणी लक्षात घेता आता राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रेमडेसिविर आणि करोनाच्या ज्या ज्या लसींना देशात मान्यता मिळाली आहे, त्या लसींच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

टेंडरसाठी ५ सदस्यांची समिती

ग्लोबल टेंडरची प्रक्रिया येत्या १ मे पासून सुरू करण्यात येणार असून त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दारूसाठी वणवण.. सॅनिटायझर प्यायल्याने यवतमाळमध्ये ७ जणांचा मृत्यू!

अंधेरीत बोगस कॉल सेंटर… १०९ मोबाईल, ८३ हार्डडिस्क, तर १० जण ताब्यात