राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळतीये. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. पुण्यातही कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
पुण्यात लॉकडाऊन करू नये, अशी सर्व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. त्यामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात येणार नाही. परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात येणार आहेत, अशी भूमिका अजित पवार यांनी या बैठकीत घेतल्याचं कळतंय.
पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.
Comments
Loading…