in ,

अक्षय कुमारने पूर्ण केले ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे चित्रीकरण

अक्षय कुमार गेले अनेक महिने त्याच्या आगामी ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. या वर्षी जूनमध्ये मुंबई परिसरात एका मोठ्या सेटवर चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात करण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वी अक्षय याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान चांदणी चौकातील रस्त्यांवर धावताना दिसला होता. त्याचा तेव्हाचा फोटो बराच व्हायरल झाला होता. पण आता अक्षयने निर्माता-दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या आगामी रक्षाबंधन चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत पूर्ण केले आहे.

दिल्लीमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस होता आणि याच बरोबर चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग पूर्ण झाले आहे. अक्षयबरोबर या चित्रपटात भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात चित्रपटगृहात रिलीज होण्यास तयार आहे. आनंद एल राय दिग्दर्शित, हिमांशू शर्मा आणि कनिका ढिल्लन द्वारा लिखित, या चित्रपटाची निर्मिती केप ऑफ गुड फिल्म्सच्या सहकार्याने कलर येलो प्रोडक्शन्स, झी स्टुडिओज आणि अलका हिरानंदानी यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘शरद पवार केंद्राची ऑफर न स्वीकारण्याइतके कच्च्या गुरुचे चेले नाहीत’

जर ईडी निष्पक्षपातीपणे तपास करणार असेल, तर…; अनिल देशमुखांनी सांगितलं चौकशीला न येण्याचं कारण