in ,

अभिनेता अक्षय कुमार रुग्णालयात दाखल

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाल्यामुळे अक्षयला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला, ” तुमच्या सर्वांच्या आशिर्वाद आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद, तुमच्या प्रार्थनांचा प्रभाव दिसत आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून डाक्टरांच्या देखरेखीखाली राहण्यासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. आशा करतो लवकर घरी परतेन, काळजी घ्या.” अशा आशयाचं ट्विट अक्षयने केलं आहे.

4 एप्रिलला अभिनेता अक्षय कुमारला करोनाची लागण झाली. सोशल मीडियावरून अक्षयने त्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची बातमी दिली होती. त्यानंतर तो होम क्वारंटाइन होता. मात्र अक्षय कुमारची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हीरानंदानी रुग्णालयात अक्षय कुमारला दाखल करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरून अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम; शिवसेना म्हणते…

Rafale deal | भारतीय मध्यस्थाला कोट्यवधींची दलाली