in ,

देशातील ‘या’ १३ नेत्यांची केंद्र सरकारकडे मोफत लसीकरणाची मागणी

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची न्यायालयानेही दखल घेतली असून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी. देवेगौडा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील १३ नेत्यांनी केंद्र सरकारकडे तत्काळ मोफत लसीकरण सुरू करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करून एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवदेनात कोरोना परिस्थितीसंदर्भात करण्यात आलेल्या मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. देशात कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील आरोग्य केंद्र आणि सर्व रुग्णालयांना विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर लक्ष्य केंद्रीत करावं.

केंद्र सरकारने संपूर्ण देशात तत्काळ मोफत लसीकरण कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांतील नेत्यांनी केली आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पात 35,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. हा निधी कोरोना लसीकरणासाठी वापरण्यात यावा, असंही नेत्यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिविर पुरवठ्याचे योग्य नियोजन सुरू

Remdesivir | भारताच्या मदतीला अमेरिका आली धावून