in

‘आजपर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन केलंय’

नुकतेच माओवादी संघटनेने एक पत्रक काढले होते. त्यामध्ये त्यांनी मराठ्यांनो दलाल नेत्यांपासून सावध व्हा, तुमच्या संघटीत शक्तीला ते राजकारणाकरीता वापरत आहेत, असे म्हटले होते. त्यांच्या या पत्रकानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही पत्रक काढून सर्वच नक्षलवादी संघटनांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येण्याबाबत आवाहन केले होते.

याबाबत विचारले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारले असता, सर्वच नक्षलवादी संघटनांना यापूर्वीच्या सर्वच राज्यकर्त्यांनी मुख्य प्रवाहात सामील होण्यास आवाहन केले होते, अशी प्रतिक्रिया दिली. आजपर्यंत जेवढेही राज्यकर्ते झाले आहेत, त्या सर्वांनीच नक्षलवाद्यांना मुख्यप्रवाहात येण्याचे आवाहन केले आहे. शिवाय सर्वच नक्षलवाद्यांनी देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून समोर यावे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही पत्रक काढून सर्वच नक्षलवादी संघटनांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येण्याबाबत आवाहन केले होते. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वच नक्षलवादी संघटनांना यापूर्वीच्या सर्वच राज्यकर्त्यांनी मुख्य प्रवाहात सामील होण्यास आवाहन केले होते, अशी प्रतिक्रिया दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शाळेचा पहिला दिवस घरातूनच; विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी

Maharashtra Positivity rate : राज्यात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर कोल्हापूरचा तर गोंदियाचा दर सर्वात कमी