in

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ओटीटीवर प्रदर्शित, इतक्या कोटी रुपयांमध्ये झाली डील

काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा प्रदर्शित झालेला ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवल्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. पण ३०० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्मने किती रुपयांना विकत घेतले असतील असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

७ जानेवारी रोजी ८ वाजता ‘पुष्पा’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅमेझॉन प्राइमने ‘पुष्पा’ चित्रपटाचे हक्क तब्बल २२ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्र सरकारची नियमावली जारी, ११ जानेवारीपासून नवे नियम लागू

काका-पुतण्याच्या लढाईत काका जयदत्त क्षीरसागर यांची सरशी