in

ASSAM ELECTION : “हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे काम काँग्रेसचे”, अमित शाहांचा हल्लाबोल

आसाममध्ये विधानसभा निवडणुका पार पडत असताना भाजपाच्या केंद्रीय नेत्यांचे दौरे पार पडत आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी आसामच्या कामरुपमध्ये प्रचारसभा घेतली. यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली. काँग्रेस लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून शाह यांनी मोदींच्या सबका साथ सबका विकास, या घोषणेची आठवण करून दिली.

“काँग्रेसला लोकांमध्ये बोडो आणि इतर, आसामी-बंगाली, हिंदू-मुस्लीम, वरील आसाम-खालील आसाम, आदिवासी-बिगरआदीवासी अशी फूट पाडू पाहत आहे. नरेंद्र मोदींची घोषणा मात्र ‘सबका साथ सबका विकास’ अशी आहे,” असं शाह यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दीपाली चव्हाण प्रकरणानंतर ‘टास्क फोर्सची’ स्थापना

ऑक्सिजन सिलेंडर घेऊन कोरोना रुग्णाचे महापालिकेसमोर समोर ठिय्या आंदोलन