in

अमित शाह यांची छत्तीसगडमध्ये जाऊन जवानांना श्रद्धांजली

छत्तीसगडमधील बिजापूर येथील तारेम जवळच्या जंगलात शनिवारी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 22 जवानांचा मृत्यू झाला. शनिवारी झालेल्या नक्षल चकमकीपासून एक जवान अजूनही बेपत्ता आहे.
चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुकमा-बिजापूर बॉर्डवर पोहोचले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह आणि भूपेश बघेल यांनी चकमकीत प्राण गेलेल्या जवानांना जगदलपूर येथे श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर अमित शाह हे जगदलपूरमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. तसंच, जखमी जवानांचीही ते भेट घेणार आहेत. सीआरपीएफ कॅम्पचाही ते दौरा करतील.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चकमकीनंतरच्या स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत गृहसचिव अजय भल्ला, इंटेलिजियन्स ब्युरोचे संचालक अरविंद कुमार आणि गृह मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.

छत्तीसगढमधील विजापूरच्या जंगलात शनिवारी नक्षलावादी आणि सुरक्षा जवानांमध्ये भीषण चकमक उडाली होती. यावेळी नक्षल्यांनी केलेल्या घातपाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. तर १४ जवान बेपत्ता झाले होते. बेपत्ता जवानांच्या शोधासाठी रविवारी सकाळी मोहीम हाती घेण्यात आली. बेपत्ता असलेल्या १४ जवानांचे मृतदेह जंगलात सापडले असून, २२ जवान शहीद झाल्याने मोठी खळबळ उडाली या चकमकीत जवानांनी १५ नक्षल्यांना ठार केले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

योगी आदित्यनाथांनी दिली शिवी? , सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आंदोलन