in

बिग बी बोलतायत थेट कोरोना बाधित रुग्णांशी

विविध माध्यमातून कोरोनाबाधित उपचार घेत असलेल्या लोकांना मानसिक आधार देण्याचं काम अनेक जण करतात आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील पेशाने शिक्षक असलेले पण अमिताभ बच्चन यांची हुबेहूब भूमिका करणारे शशिकांत पेडवाल सध्या कोरोनाबधित रुग्णांशी ऑनलाइन संवाद साधतायत.

आत्तापर्यंत त्यांनी ३६२ रुग्णांशी संवाद साधून त्यांना मोठा मानसिक आधार दिला आहे. शशिकांत हे हुबेहूब अमिताभ बच्चन यांच्या पेहेरावत आणि आवाजात रुग्णांशी संवाद साधतायत. यामुळे अनेक जणांना साक्षात अमिताभ बच्चन आपल्याशी बोलत असल्याचा वाटत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आंनद त्याना जगण्याची ऊर्जा देतो. बच्चन यांचे काही डायलॉग, गाणी, कविता ते रुग्णांना ऐकवतात. पुणे,मुंबई सहा इतर राज्यात आणि परदेशातील कोरोनाबधित रुग्णांशी त्यानी संवाद साधुन त्यानं धीर दिलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Momsoon 2021 | मुंबईत पुन्हा जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरूवात

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आज शरद पवारांची भेट घेणार