in

वर्धा नदीत बोट उलटली; एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले; चौघांचे मृतदेह हाती

अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सध्या नावाड्यासह चौघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांना शोध बचाव पथकाने सुरू केला आहे.

गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक सोमवारी तेथे पोहचले होते. सोमवारी दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आज सकाळी सर्व जण श्री क्षेत्र झुंज येथे पोहचले. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका बोटीतून महादेव मंदिराकडे जात असताना पर्यटकांची बोट नदीपात्रात उलटली. त्यात कुटुंबातील अकरा जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. घटनास्थळी मदत व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहचले. आतापर्यंत चौघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

14 सप्टेंबरला ‘हिंदी दिवस’ का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

रांगोळीच्या सहाय्याने साकारली लालबागच्या राजाची हुबेहूब प्रतिमा