in

रायगडावरील उत्खननात सापडली पुरातन बांगडी

किल्ले रायगड वनसंपदेनं परिपूर्ण या परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी उत्खनन सुरू आहे. या उत्खनान अनेक दुर्मिळ आणि प्राचीन काळातील वस्तू सापडत आहेत. रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननाचे महत्त्व आज पुन्हा प्रत्ययास आले. कारण, येथील उत्खननात सोन्याची पुरातन बांगडी आढळून आली आहे.

पुरातत्व विभागाच्या प्राधिकरणामार्फत गडावर आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळालेल्या आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याच्या धातूपासून बनवलेली पुरातन मौल्यवान बांगडी सापडली आहे. या संदर्भात खुद्द खासदार संभाजीराजेंनीच यासंदर्भात माहिती देत आनंद व्यक्त केला आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन संभाजीराजेंनी या बांगडीचे फोटोही शेअर केले आहेत.

रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननाचे महत्त्व आज पुन्हा प्रत्ययास आले. प्राधिकरणामार्फत…

Posted by Yuvraj Sambhajiraje Chhatrapati on Friday, 2 April 2021

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Assam Elections : भाजपा उमेदवाराच्या गाडीत EVM सापडल्यानंतर पुन्हा मतदान होणार – निवडणूक आयोगाची माहिती

घरात दोन कोरोनाबाधित असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला ?