in

आनंद महिंद्रांनी केले मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे कौतुक

राज्यात आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी काल फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, तेथील वैद्यकीय यंत्रणांची उपलब्धता पाहून त्या जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथील करण्याबाबत किंवा वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यासाठी, जिल्हा पातळीवर आढावा घेण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

याच पार्श्वभूमीवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय. पारदर्शी, सक्रीय आणि दिलासा देणारे विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय. त्यांचे हेच दिलासादायक आणि व्यवहार्यपूर्ण विधान ऑक्सिजनची पूर्तता आणि टीपी रेटला धरुन आहे, असे आनंद महिंद्र यांनी म्हटलंय.

यापूर्वी देखील कोरोना संदर्भात मुख्यमंत्र्यांनी उद्योग उद्योगपतींशी चर्चा केली होती. या बैठकी नंतर देखील आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

Maratha Reservation | बीड येथे निघणार, मराठा क्रांती संघर्ष मोर्चा