in

अनिल देशमुखांच्या चौकशीसाठीची समिती म्हणजे, जनतेचं ‘एप्रिल फूल’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळं राज्याचं राजकारण तापले आहे. विरोधकांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर परमवीर सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे राज्य सरकारने देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली.

मात्र या समितीवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी चांदीवाल चौकशी समिती स्थापन करून राज्य सरकारने १ एप्रिलच्या आधीच जनतेला अक्षरश: एप्रिल फूल बनवल्याचं भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

परमबीर सिंग उच्च न्यायालयात गेल्यामुळे राज्य सरकारने बुधवारी कैलास चांदीवाल समिती स्थापन केली. ही समिती, चौकशी आयोग अधिनियम, १९५२ अंतर्गत नेमलेली नाही. त्यामुळे या समितीला कोणालाही नोटीस बजावण्याचा अधिकार नाही. समितीकडून संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावल्यावर उपस्थित राहिलेच पाहिजे असे बंधनही नसेल. त्यामुळे ही समिती म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे,’ अशी टीका उपाध्ये यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फेसबुकची ‘ही’ सेवा ठप्प झाल्याने यूझर्सची मोठी नाराजी

Stock Market | सेन्सेक्स 627 अंकांनी घसरला