in

दिलीप वळसे-पाटलांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनिल देशमुखांचं ट्विट म्हणाले …

दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी राज्याच्या गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेत आशीर्वाद घेतले. या सर्व संदर्भात गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनिल देशमुख यांनी नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अनिल देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. “आज माझे स्नेही दिलीपराव वळसे पाटीलजी यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा!,” असे अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. याप्रकरणी जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेनेला धक्का; माजी आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश

पुणे महापालिकेकडून सुधारित नियमावली जाहीर; ‘या’ सेवा सुरू राहणार