in

मनसुख हिरेनप्रकरणी आणखी एकाला अहमदाबादवरून अटक

मनसुख हिरेन प्रकरणात आणखी एका आरोपीला अहमदाबादमधून अटक करण्यात आली आहे. ठक्कर असं या व्यक्तीचं नाव आहे. ठक्कर हा एटीएसच्या ताब्यात होता, आता त्याला एनआयएच्या ताब्यात देण्यात येत आहे. ठक्कर हा या प्रकरणाती महत्त्वाचा आरोपी असल्याने त्याच्याकडून याप्रकरणी आणखी काही माहिती हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ठाणे एटीएसच्या टीमने ठक्करला अहमदाबादमधून अटक केली होती. गेल्या चार दिवसांपासून तो एटीएसच्या ताब्यात होता. ठक्करने सीमकार्ड पुरवण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना मदत केल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी एटीएसने ठक्करचा कसून तपास केला आहे. आता त्याला एनआयएच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे हिरेन प्रकरणात वापरण्यात आलेल्या सीम कार्डच्या अनुषंगाने त्याची चौकशी करण्यात येणार आहे. शिवाय त्याचा हिरेन हत्येशी काही संबंध आहे का? या दिशेनेही त्याचा तपास केला जाण्याची शक्यता आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उद्या मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंगांच्या याचिकेवर सुनावणी!

Gold Price Today | सोनं आणखी स्वस्त, वाचा आजचे दर?