in

सुबोधकुमार जयस्वाल यांची CBI संचालकपदावर नियुक्ती

गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयचे प्रमुखपद हे रिक्त होते अखेर त्या जागेवर आयपीएस सुबोधकुमार जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. याआधी ‘महाराष्ट्र पोलिस विभागाच्या’ महासंचालक पदावर ते राहिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमणा आणि कॉंग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीने आणि आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संचालक म्हणून नियुक्त केले. महाराष्ट्र केडरमधील 1985 च्या तुकडीचे अधिकारी सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona : दिलासादायक, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा घटला

लोकल चालवण्यासाठी रेल्वे सज्ज, पण…