in

अरविंद केजरीवाल यांनी मागितली माफी

वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेतली. त्यांनी या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी देखील चर्चा केली. मात्र, त्यांच्या या चर्चेचा व्हिडीओ टीव्हीवर लाईव्ह केला गेला आणि हा वादाचा मुद्दा ठरला. केंद्र सरकारने यावर टीका करताना म्हटलंय की, केजरीवाल यांनी राजकरण करण्यासाठी तसेच खोटं पसरवण्यासाठी या लाईव्हचा उपयोग केला आहे.

या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका कृतीवर पंतप्रधान मोदी नाराज झाले आहेत. त्यांनी मीटिंगच्या दरम्यानच केजरीवाल यांना कडक शब्दांत सुनावलं आणि म्हटलं की, आपण एक खूपच महत्त्वाचा असा प्रोटोकॉल तोडला आहे. बैठकीतील खाजगी बातचितीचा कधीही प्रचार-प्रसार केला जात नाही. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी देखील पंतप्रधान मोदी यांची माफी मागितली आहे.

यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय की, आज मुख्यमंत्र्यांचं संबोधन लाईव्ह केलं गेलं कारण या बैठकीचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाऊ नये अशी कोणत्याही प्रकारची लिखित अथवा शाब्दिक सुचना केंद्र सरकारकडून देण्यात आली नव्हती. तरीही, झालेल्या तसदीबद्दल मी खेद व्यक्त करतो, असं स्पष्टीकरण अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नागार्जुनचा ‘वाइल्ड डॉग’ आता ओटीटीवर प्लेटफॉर्मवर

Mohit Raina | देवों के देव महादेव फेम मोहित रैनाला कोरोनाची लागण