in

प्रसिद्ध गायकाला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर आर्या आंबेकरने सोडलं मौन

गेल्या काही दिवसांपासून आर्या सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध गायक आणि संगितकाराला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र आता आर्याने एक पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्ण विराम दिलाय. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’आर्या आंबेकरला खरी ओळख मिळवून दिली. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गोड गळ्यासोबत आर्याच्या सौंदर्याने देखील अनेकांना भुरळ घातली आहे.

आर्याने एक फोटो शेअर करत सांगितलं, “गेल्या १२ वर्षांपासून कोणतीही टॅलेंट एजन्सी मला मॅनेज करत नाही. इंन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवरील माझे सर्व फॉलोअर्स ऑर्गेनिक आहेत. तसचं यूट्यूबवरील सबस्क्रायबर आणि व्हूजदेखील ऑर्गेनिक आहेत. फॉलोअर्स, सबस्क्रायबर आणि व्हूवज् विकत घेण्याच्या संकल्पनेवर माझा विश्वास नाही आणि मी त्याच्या विरोधात आहे. ते माझ्या नैतिकते बसत नाही.” असं म्हणत आर्याने प्रमोशन किंवा कार्यक्रमांसाठी ती थेट संवाद साधत असून ती स्वत: सर्व मेल किंवा मेसेजेसला उत्तर देत असल्याचं स्पष्ट केलंय.

गेल्या काही दिवसांपासून आर्या सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध गायक आणि संगितकाराला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र आता आर्याने एक पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्ण विराम दिलाय. या पोस्टमध्ये आर्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. “आधी दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं. मात्र माझ्या प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते. शिवाय काही ओळखीच्या व्यक्तीं त्याबद्दल काही गोष्टी बोलत असल्याचं कळालं. त्यामुळे स्पष्ट करण्याच ठरवलं” असं तिने कॅप्शनमध्ये म्हंटलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार प्रवीण दरेकरांना कुणी दिला?; सुरेखा पुणेकरांचा सवाल

Cabinet meeting | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; चक्रीवादळांच्या उपाययोजनांसाठी कोकणला 3 हजार कोटी