in

मुलींना लाईन द्यायला सांगा; तरूणाचे थेट आमदारांनाच पत्र

अनिल ठाकरे | दारू विकणाऱ्याला व काळ्या पोरांना गर्लफ्रेंड असते, मात्र मला एकही मुलगी पटत नसल्याची चिंताग्रस्त पत्र चंद्रपुरातील तरूणाने आमदाराला लिहले आहे. हे पत्र सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत असून, या पत्राची एकच चर्चा रंगली आहे.

मुली भाव देत नाही म्हणून चिंतामग्न तरूणाने थेट आमदारानांच पत्र लिहिले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातील तरुणाचे हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. पत्रातून अजब व्यथा व्यक्त करणारा हा युवक अजूनही सापडलेला नाही. त्यामुळे हे पत्र किती गांभीर्याने घ्यायचे, हा प्रश्नच आहे. मात्र या व्हायरल पत्राने धमाल उडवली, एवढं मात्र नक्की.

तालुक्यात भरभरून मुली आहेत. मात्र एकही मुलगी पटत नसल्याची त्याची चिंता त्याने पत्रातून मांडली आहे. अर्जदार खेड्यात राहतो. तो राजुरा-गडचांदूर रोज ये-जा करतो. परंतु त्याला एकही मुलगी पटत नाही, असा मजकूर पत्रात लिहिला आहे. दारू विकणाऱ्याला व काळ्या पोरांना girlfriend असते हे बघून अर्जदाराचा जीव जळून राख होतो, असे पत्रात म्हटले आहे. पत्राच्या शेवटी अर्जदार भूषण जांबुवंत राठोड याने आमदार सुभाष धोटे यांना, विधानसभा क्षेत्रातील मुलींना अर्जदाराला भाव देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची नमुनेदार विनंती केली आहे. पत्र लिहिणारा हा अर्जदार नेमका कोण आहे आणि कुठे राहतो, याबाबत अद्याप अनभिज्ञता आहे, तर दुसरीकडे आमदार सुभाष धोटे यांनी अशा आशयाचे पत्रच मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे. विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना या उत्साही युवकाचा शोध घेण्यास त्यांनी सांगितले असून, तो सापडल्यास शक्य ती मदत करता येईल, असे आमदार महोदयांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा चौकार; आठवड्यातून चार दिवस निखळ मनोरंजन

कोयनासह चांदोली धरणातून कृष्णा, वारणेत विसर्ग; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ…