in

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न

काही दिवसांपासून चर्चेत असणारे बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला. गायकवाड यांची इनोव्हा कार पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

आमदार संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते, रात्री दीड वाजता ते घरी परत आले… त्यानंतर 3 वाजेच्या सुमारास 2 अज्ञात व्यक्तींनी टू व्हीलरवर येऊन वाहनाची पेट्रोलची टॅंक जिथे असते, त्याठिकाणी पेट्रोल टाकून ईनोवा गाडी पेटवून दिलय, त्याच्या पुढे मागे 4 ते 5 गाड्या उभ्या होत्या, एक गाडीत पेटली असता ती सर्व वाहने पेटली जातील आणि घर क्षतिग्रस्त होऊन गायकवाड परिवाराला इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्या गेल्याचा आरोप होत आहे… दरम्यान हा हल्ला करतेवेळी या परिसरातील विद्युत पुरवठा हल्लेखोरांनी तोडला होता, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्र सरकारला पत्र लिहून नुकसानग्रस्तांसाठी मदतीची मागणी

परमबीर सिंहांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; सट्टेबाज सोनू जालानचा जबाबात मोठा गौप्यस्फोट