in

घरात दोन कोरोनाबाधित असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला ?

बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यातील बडे नेते या सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान घरात दोन कोरोनाबाधित रुग्ण असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

ट्विट करत अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा.

बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचे मुंबईच्या महौपार किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.त्याचबरोबर आरोग्य यंत्रणांवरील बोजा कमी करण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महापौरांच्या याच वक्तव्यावरुन अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रायगडावरील उत्खननात सापडली पुरातन बांगडी

“अत्यंत घाण भाषेत आम्हीही रिअ‍ॅक्ट होऊ शकतो”