in

वाझेचा आणखी एक ‘कार’नामा; आठवी गाडी एनआयएच्या ताब्यात

सचिन वाझे यांच्या प्रकरणात दिवसेंदिवस नव्या गाड्या समोर येत आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येत वाझेंचा हात असल्याचं समोर आल्यानंतर एनआयएने तपासाची चक्र आणखी गतीने फिरवली. यामध्ये आता काळ्या रंगाची ऑडी एनआयएने ताब्यात घेतली आहे. स्कॉर्पिओपासून सुरू झालेला हा हायप्रोफाईल गाड्यांचा कारनामा आता ऑडीपर्यंत पोहोचला आहे.

काहीच वेळात ही कार एनआयएच्या मुंबईतील कार्यालयात आणण्यात येणार आहे. त्यामुळे कारचा संबंध या प्रकरणात काय आहे, तसेच त्यामधून कोणते तपशील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती येतील, हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सावधान… कोरोना रुग्णांच्या आणखी संख्येत वाढ

आता ५०० रुपयांमध्ये होणार कोरोना चाचणी