in

ऑस्ट्रेलियानं भारतातून येणारी प्रवासी विमानं १५ मेपर्यंत केली रद्द

भारतात करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहाता ऑस्ट्रेलियानं देखील कठोर निर्णय घेतला आहे. भारतातून ऑस्टेलियाला जाणारी सर्व प्रवासी विमानं रद्द करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला आहे. या आधी एअर इंडियानं ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमानं रद्द केली आहेत. सध्या भारतात आयपीएलचा हंगाम सुरू असून ऑस्ट्रेलियातील अनेक खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि काही नागरिक देखील भारतात दाखल आहेत. ते देखील या निर्णयामुळे भारतात अडकून राहणार असल्यामुळे त्यांना आता १५ तारखेपर्यंत ऑस्ट्रेलियाला परत जाता येणार नाही आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. “१५ मे पर्यंत विमानांवर असलेली ही बंदी कायम राहणार आहे. भारतातून येणाऱ्या नागरिकांमध्ये करोनाचा धोका वाढू शकतो म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे”, असं स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी थायलंड, नेदरलँड, इराण, कॅनडा, युएई, हाँगकॉंग या देशांनी देखील भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर देशात प्रवेशावर बंदी घातली आहे. एअर इंडियानं नुकतीच ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमानं येत्या ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”मद्रास हायकोर्टाची टिप्पणी गांभीर्यानं घेतली पाहिजे”

विमान प्रवासादरम्यान हवेतच झाला ५२ प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग