आयपीएलच्या १४ व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी खेळाडूंमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. यात आता दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलची भर पडलीय. अक्षरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने दिल्ली कॅपिटल्सची चिंता वाढली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अक्षर पटेलच्या प्रकृतीबाबत सोशल मेडियावर अधिकृत माहिती दिली आहे.
कोरोनाची लक्षात घेता यंदाच्या आयपीएलचे सामने मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता व नवी दिल्ली या सहा शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत.
अक्षर २८ मार्चला मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. मात्र दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या अक्षर विलगीकरणात आहे. दिल्ली कॅपिटल्सची वैद्यकीय टीमही त्याच्या संपर्कात आहे. दिल्ली कॅपिटल्सने “तो लवकर बरा होईल, यासाठी त्याला शुभेच्छा देतो” असे निवेदनात म्हटले आहे.
Comments
Loading…