in

‘तुमचा बाप आणि भाऊ तर’…महुआ मोईत्रा रामदेव बाबांवर भडकल्या

बाबा रामदेव यांनी “कुणाचा बापही आपल्याला अटक करू शकत नाही,” असं विधान केलं. त्यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांच्या चांगल्याच भडकल्या. मोदी आणि शाह यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी बाबा रामदेव यांना सुनावलं.

रामदेव यांनी “कुणाचा बापही आपल्याला अटक करू शकत नाही,” असं विधान केलं. हे विधान व्हायरल झालं असून, त्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना संताप अनावर झाला. त्यांनी ट्विट करत बाबा रामदेव यांना सुनावलं आहे. या ट्विट मधून मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही नामोल्लेख टाळत टीकास्त्र डागलं आहे.

काय म्हणाल्या महुआ? –

‘स्वामी रामदेवला कुणाचा बापही अटक करू शकत नाही.” रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत,’ असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांना प्रत्युत्तर दिलं.

देश कोरोना संकटाला तोंड देत असतानाच बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीची थट्टा उडवली होती. त्याचबरोबर अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांबाबतही त्यांनी अवमानजनक वक्तव्य केलं. बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानांचा निषेध करत आयएमएने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध साथरोग कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. बाबा रामदेव यांच्याविरोधात आयएमएने आक्रमक पवित्रा घेत त्यांना १५ दिवसात माफी मागावी अन्यथा १००० कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी नोटीस बजावली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PNB घोटाळ्याप्रकरणी फरार मेहुल चोक्सीला अटक

1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार का? आज ठाकरे सरकारची महत्त्वाची बैठक