in

‘माझं वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री निधीसाठी देणार’

सध्या कोरोनाचं संकट आहे. अशा काळात मी माझं वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे. तसंच काँग्रेसचे इतर सर्व आमदार त्यांचं एका महिन्याचं मानधन मुख्यमंत्री निधीला देतील, अशी माहिती महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्रात १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळावी अशी सोनिया आणि राहुल गांधींची भूमिका होती. मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही हा विषय मांडला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांचं यावर एकमत झालं होतं, असंही थोरात म्हणाले.

कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे मदतीचा निर्णय घेतला. अमृत उद्योग समुहात ५ हजार कर्मचारी आहेत. त्यांचा खर्च आम्ही करणार आहोत, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाच्या संकटात लवकर भारत सोडा; अमेरिकेचा नागरिकांना संदेश

लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो; प्राध्यापकाचा लस घेण्यास नकार